‘आठवले जेव्हा मुक्तछंदात बोलतात….’

भारतीय रिपब्लिकन पक्षाचे खासदार रामदास आठवले नेहमीच त्यांच्या कवितेतून सगळ्यांचे मनोरंजन करताना दिसून येतात. ते त्यांच्या कवितेच्या माध्यमातून विरोधकांवर निशाणा साधण्याचा प्रयत्न करतात.
‘आठवले जेव्हा मुक्तछंदात बोलतात….’

नाशिक, १८ मे २०२४, प्रतिनिधी : भारतीय रिपब्लिकन पक्षाचे खासदार रामदास आठवले नेहमीच त्यांच्या कवितेतून सगळ्यांचे मनोरंजन करताना दिसून येतात. ते त्यांच्या कवितेच्या माध्यमातून विरोधकांवर निशाणा साधण्याचा प्रयत्न करतात. नुकतंच त्यांनी नाशिकमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. आम्ही महाविकास आघाडीला देत आहोत अशी टक्कर की महाविकास आघाडीच्या नेत्यांना आली पाहिजे चक्कर अशी कविता करत त्यांनी महायुतीच्या विजया खात्री व्यक्त केली आहे. 

पुढे आठवले म्हणाले,नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात निवडणूक लढवत आहोत. महायुतीला ४०० पेक्षा जास्त जागा मिळतील तसेच उत्तर प्रदेशमध्ये ७० ते ७५ जागांचे लक्ष्य आहे. तेलंगणात भाजपाला चार जागा होत्या. आता त्या जागाही वाढल्या आहेत. त्यांनी महायुतीच्या विजयाची खात्री व्यक्त केली. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version