…तरीही मोदी आघाडीत नाही !

…तरीही मोदी आघाडीत नाही !

मुंबई, ३० ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : एनडीएचे सदस्य नाही पण मोदी विरोधी आघाडीतही नाही असे दोन पक्ष महाराष्ट्रात आहेत. प्रकाश आंबेडकर यांचा भारिप बहुजन महासंघ आणि राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना हे दोन पक्ष मोदी विरोधी आघाडीत सहभागी झालेले नाही.

मोदी विरोधी आघाडीची बैठक मुंबईत झाली. या बैठकीला येण्यासाठी राजू शेट्टी यांना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी फोन करून आमंत्रण दिले होते. पण अद्याप पक्षाचा निर्णय झालेला नाही, असे सांगत राजू शेट्टी यांनी मोदी विरोधी आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहणे टाळले.

प्रकाश आंबेडकर यांनी काही महिन्यांपूर्वी उद्धव ठाकरे गटासोबत हातमिळवणी केली आहे. पण प्रकाश आंबेडकर यांना मोदी विरोधी आघाडीकडून बैठकीचे आमंत्रण देण्यात आले नव्हते. यामुळे प्रकाश आंबेडकर यांचा भारिप बहुजन महासंघ अद्याप मोदी विरोधी आघाडीत सहभागी झालेला नाही.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version