Rajool Patil Tweet: वडिलांनी ठाकरेंची साथ सोडली, कन्येने केली भूमिका जाहीर; बंडखोर खासदाराच्या लेकीच्या सोशल मिडिया पोस्टमुळे वाढला संभ्रम

मात्र, शुक्रवारी शिवसेनेच्या वर्धापनदिनी राजूल पाटील  यांच्या ठाकरे गटाला शिवसेना वर्धापनदिनाच्या शुभेच्छा देणारी पोस्ट शेअर केली आहे. 
Rajool Patil Tweet: वडिलांनी ठाकरेंची साथ सोडली, कन्येने केली भूमिका जाहीर; बंडखोर खासदाराच्या लेकीच्या सोशल मिडिया पोस्टमुळे वाढला संभ्रम

सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या आणि महत्त्वाच्या घडामोडी होताना पाहायला मिळत आहेत. शिवसेना उद्धव ठाकरे गटातील सहा खासदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत एकनाथ शिंदेंच्या पक्षात जाण्याचा निर्णय घेतला आहे.  संजय दिना पाटील  यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून शिंदे गटात जाण्याचे स्पष्ट केल्यानंतर त्यांची मुलगी राजोल पाटील यादेखील त्यांच्यासोबत जाईल, असा कयास होता. मात्र, शुक्रवारी शिवसेनेच्या वर्धापनदिनी राजूल पाटील  यांच्या ठाकरे गटाला शिवसेना वर्धापनदिनाच्या शुभेच्छा देणारी पोस्ट शेअर केली आहे. 

त्यामुळे राजूल पाटील या  ठाकरेंच्या शिवसेनेसोबत की शिंदे शिवसेनेसोबत आहेत, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. याबाबत जाणून घेण्यासाठी राजूल पाटील यांच्याशी संपर्क केला असता तो होऊ शकलेला नाही. त्यामुळे राजूल पाटील नक्की कोणत्या पक्षात आहेत, याबाबत शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांमध्ये सुद्धा या सगळ्या संदर्भात संभ्रम निर्माण झाला आहे. 

हेही वाचा – Omraje Nimbalkar First Reaction : “…त्यानंतर माझी भूमिका जाहीर करणार” ओमराजे निंबाळकर शिंदेंनाही ‘धप्पा’ देण्याच्या तयारीत? 

ठाकरेंच्या शिवसेनेतून बंडखोरी केलेल्या खासदारांपैकी एक असलेल्या संजय दिना पाटील यांच्या कन्या राजूल पाटील यांनी ठाकरेंच्या शिवसेनेच्या 60 व्या वर्धापन दिनानिमित्त प्रदर्शित करण्यात आलेला टीझर सोशल मीडियावर शेअर केला आहे. संजय दिना पाटील यांचा सहा बंडखोर खासदारांमध्ये समावेश असताना त्यांच्या कन्येने शिवसेनेचा टीझर शेअर केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version