Rajan Salvi : ‘कोकणात शिवसेना सर्वात मोठा पक्ष, विधान परिषदेसाठी शिंदे गटातून इच्छुकांची गर्दी’; राजन साळवींचा व्हिडीओ व्हायरल

Rajan Salvi : ‘कोकणात शिवसेना सर्वात मोठा पक्ष, विधान परिषदेसाठी शिंदे गटातून इच्छुकांची गर्दी’; राजन साळवींचा व्हिडीओ व्हायरल

रत्नागिरी : कोकण स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद मतदार संघासाठी शिवसेनेत इच्छुकांची संख्या वाढत असून माजी आमदार राजन साळवी यांनीही उमेदवारीसाठी दावा केला आहे. यापूर्वी विकास गोगावले आणि सदानंद चव्हाण यांनीही इच्छा व्यक्त केली होती. रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्गमध्ये शिंदे शिवसेनेचे मतदार अधिक असल्याने ही जागा शिवसेनेलाच मिळावी, अशी मागणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केल्याचे साळवी यांनी सांगितले. पक्षाने संधी दिल्यास जबाबदारी समर्थपणे पार पाडू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच महायुतीत कोणताही वाद नसून मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री जो निर्णय घेतील तो मान्य असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा : Harshwardhan Sapkal: ‘मनमोहन सिंग यांचं सरकार असताना 55 रुपयांमध्ये डिझेल, मग आता 100 पार का?’; हर्षवर्धन सपकाळांचा सरकारवर निशाणा

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version