Raj Thackeray: 2008 मधील ‘त्या’ प्रकरणातून राज ठाकरे यांची निर्दोष मुक्तता,कोर्टाचा निकाल

राज ठाकरे यांची ठाणे कोर्टाने निर्दोष मुक्तता केली आहे.  मुख्य न्यायदंडाधिकारी अभिजीत व्ही. कुलकर्णी यांनी या खटल्याचा निकाल सुनावला. 
Raj Thackeray: 2008 मधील ‘त्या’ प्रकरणातून राज ठाकरे यांची निर्दोष मुक्तता,कोर्टाचा निकाल

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबद्दल एक महत्त्वाची बातमी  समोर येत आहे. 2008 साली परप्रांतीयांना मारहाण केल्याप्रकरणातील पहिल्या गुन्ह्याचा आज निकाल लागला आहे. राज ठाकरे यांची ठाणे कोर्टाने निर्दोष मुक्तता केली आहे.  मुख्य न्यायदंडाधिकारी अभिजीत व्ही. कुलकर्णी यांनी या खटल्याचा निकाल सुनावला. 

2008 प्रकणातील निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. याच प्रकरणी आता राज ठाकरे यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. त्यामुळे राज ठाकरे यांना दिलासा मिळाला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, कोर्टात सादर करण्यात आला पुरावा हा पुरेसा नव्हता. त्याशिवाय, काही पुरावे नियमाच्या अनुषंगाने नव्हते. आरोपी क्रमांक 1 ते 7 यांच्यावर मारहाण केल्याचा आरोप होता. मात्र, कोर्टासमोर सरकारी पक्षाने सादर केलेला पुरावा सादर करता आला नाही. 

नेमकं प्रकरण काय?
2008 साली ऑल-इंडिया रेल्वे भरती परीक्षेसाठी महाराष्ट्रात, विशेषतः कल्याण परिसरात मोठ्या संख्येने परप्रांतीय उमेदवार आले होते. याचदरम्याने राज ठाकरे यांनी  ‘मराठी तरुणांच्या नोकऱ्या परप्रांतीयांनी हिरावल्या’ असा आरोप करत भडकाऊ भाषण केले आणि या चिथाणीखोर भाषणामुळे मनसे कार्यकर्त्यांनी कल्याण रेल्वे स्थानकावर परप्रांतीय विद्यार्थ्यांना मारहाण केली आणि रेल्वे मालमत्तेचे मोठे नुकसान केले, असा पोलिसांचा आरोप होता. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version