महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज नाशिकमध्ये आयोजित सभेमध्ये बोलताना मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी भाजपावर पक्षांतरावरून जोरदार हल्लाबोल केला आहे. कोण कुठं चाललंय कोण काय चाललंय मागे एकदा म्हटलं होतं ना, इतका चुकीचा कॅरम फुटलाय ना कुणाच्या सोंगट्या कुणाच्या भोकात आहे हेच कळत नाही. प्रत्येकाला विचारावं लागतं आज कुठे? काही जण वेडेपिसे झाले, त्या दिवशी कळलं एकाने छाननीच्या वेळी समोरच्याचा एबीफॉर्म घेतला आणि गिळला, असा हल्लाबोल यावेळी राज ठाकरे यांनी केला आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, वेळ नव्हता, दिवस नव्हता, एखादा दिवस असता तर सकाळी तरी एबी फॉर्म बाहेर पडला असता. तीही वेळ दिली नाही. कोणत्या थराला गेल्या आहेत निवडणुका? बिनविरोध निवडून येतात, तिकडच्या लोकांना मतदानाचा अधिकारही त्यांना देणार नाही का? काहीवेळा दहशतीतून, काही वेळा पैसे देऊन, आकडे ऐकतोय कुणाला एक कोटी, कुणाला पाच कोटी, कल्याण डोंबिवलीत प्रभागात एका घरातील तिघे उभे आहेत, त्यांना काय ऑफर झाली असेल? एका प्रभागातील तिन जणांना १५ कोटी रुपयांची ऑफर झाली. कुणाला पाच कोटी, कुणाला दोन कोटी, येतात कुठून एवढे पैसे? असा सवाल यावेळी राज ठाकरे यांनी केला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.