Uddhav-Raj Thackeray Interview: "त्यांच्या हातात काही नाही, वर जे दोघे…" मुंबई वेगळी न करण्याच्या फडणवीसांच्या मतावर राज ठाकरेंनी मांडली स्पष्ट भूमिका

शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांची सामनामध्ये संयुक्त मुलाखत प्रसिद्ध झाली. दरम्यान आज या मुलाखतीचा दुसरा दिवस आहे.
Uddhav-Raj Thackeray Interview: "त्यांच्या हातात काही नाही, वर जे दोघे…" मुंबई वेगळी न करण्याच्या फडणवीसांच्या मतावर राज ठाकरेंनी मांडली स्पष्ट भूमिका

राज्यात महानगपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरु असताना शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांची सामनामध्ये संयुक्त मुलाखत प्रसिद्ध झाली. ही मुलाखत शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार आणि चित्रपट निर्माते, अभिनेते महेश मांजरेकर यांनी घेतली आहे. या मुलाखतीत त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणातील सध्याची परिस्थिती, मराठी माणसाचे अस्तित्व, मुंबईचे प्रश्न आणि आगामी महापालिका निवडणुका यावर सविस्तर चर्चा केली. दरम्यान आज या मुलाखतीचा दुसरा दिवस आहे. यावेळी संजय राऊत यांनी पहिला प्रश्न उपस्थित केला.

हेही वाचा- Uddhav-Raj Thackeray Interview : ‘भाजपचा हा मुंबई तोडण्याचा प्रयत्न सुरू आहे’; वाढवण बंदर, नवी मुंबई विमानतळाबाबत राज ठाकरेंनी केले धक्कादायक खुलासे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रश्न केला की, देवेंद्र फडणवीस त्यांच्या एका सभेत म्हणाले होते की, सूर्य चंद्र असे पर्यंत मी मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळ होऊ देणार नाही. तुम्ही यावर विश्वास ठेवता का? यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले की, “माझं फक्त एवढचं म्हणण आहे की, या सगळ्यामध्ये त्यांच्या हातात काही नाही आहे. त्यांना जे वरून सांगणार तेच ते ऐकणार… पण त्यांची इच्छा चांगली आहे. वरून त्यांना सांगितलं की, जमीन अदानीला द्यायची आहे, तर त्यांच्याकडे सही करण्याशिवाय कोणता पर्याय नाही. त्यामुळे वरच्यांच्या मनात काय आहे ते जास्त महत्त्वाच आहे. इकडच्या लोकांच्या मनात काय आहे हा विषयचं येत नाही. त्यामुळे त्यांनी चंद्र, सुर्याचे कितीही दाखले दिले तरी वरती जे दोघे जण बसले आहेत त्यांच्या मनात काय आहे हे पहिलं आपल्याला कळण गरजेच आहे आणि ते आपल्याला कळतय.” 

हेही वाचा- Nitesh Rane : ‘आम्ही कधीच एकमेकांवर टीका केली नाही’; नितेश राणेंनी सांगितलं निलेश राणेंसोबतच्या ‘त्या’ निवडणुकीचं सत्य
पुढे उद्धव ठाकरे म्हणाले की, “एक मुद्दा असा आहे की, मुंबई महाराष्ट्रापासून कोणीच तोडू शकत नाही, पण ज्या पद्धतीने मुंबईची संस्कृती मारली जाते. कोणीही येतो आणि सांगतो की, इथल्या भागाची भाषा गुजराती आहे. आमच्यावर हिंदीच सक्ती करणार, म्हणजे आमची संपूर्ण अस्मिता, संस्कृती मारणार आणि नावाला मुंबई महाराष्ट्रात ठेवणार तर याला काही अर्थ नाही आहे. यांना बसं म्हटलं की बसं उठ म्हटलं की, उठणारी लोक आहेत. यांच्यावर काय विश्वास ठेवायचा.” असं म्हणत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version