मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणूक 2026 साठी येत्या 15 जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या निमित्ताने आज दादर येथील शिवाजी पार्कात आज ठाकरे बंधूंची जाहीर सभा पार पडली. यावेळी प्रथमच ठाकरे गटाची शिवसेना आणि मनसे या पक्षांची युती झाली असून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची तब्बल 20 वर्षांसाठी एकत्रित सभा या शिवतीर्थावर होत आहे. दोन्ही पक्ष एकत्रितरित्या मुंबई महापालिकेसाठी लढत असून ही त्यांची या निवडणुकीतील दुसरी एकत्रित सभा आहे. यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी आतापर्यंत राखून ठेवलेले सर्व मुद्दे मुंबईकरांसमोर मांडले.
राज ठाकरे यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे –
या व्यासपीठा बाळासाहेबांसोब लहान असताना अनेकदा आलो. शिवसेनेची स्थापना इथे झाली तेव्हा आजोबा, वडील इथे उपस्थित होते.आमची माँ मीनाताई उपस्थित होती. या क्षणाला हे दोन भाऊ एकत्र आल्यानंतर आम्ही. ते चौघे इथे हजर असायला हवे होते. हे चित्र मराठी माणूस मुंबईसाठी हा आम्ही दोन भावांनी उभा केलेला लढा वरून पाहत असतील. बऱ्याच गोष्टी आपल्यासाठी घेऊन आलोय. मराठीवर काम करणाऱ्या अनेक सामाजिक संस्था आहेत, त्यांचे आभार मानतो. अनेक प्रसार माध्यमांनी साथ दिली. त्यांचेही आभार मानतो. खरतंर २० वर्षांनी पहिल्यांदा युती करतोय. या प्रक्रियेत अनेक जणांना तिकीट दिलं. अनेक नाराज झाले. काही दुसऱ्या पक्षात गेले. त्याला दुखवणं हा आमचा हेतू नव्हता. तरी ते नाराज झाले असतील तर दिलगिरी व्यक्त करतो. जे गेले ते परत येतील.
हिंदीचा विषय आला आणि आम्ही दोघंही पेटून उठलो. भाजप सत्तेत आली आणि सगळं बदलून टाकायला निघाले. त्यांच्याकडे मतं कुठून येतात. बोगस मतदान तर सुरूच आहे. उद्दामपणा बघा, एमआयएम आणि काँग्रेससोबत युती करून बिनविरोध निवडून आले. तिकडच्या लोकांचा मतदानाचा अधिकारच काढून टाकला. ते लोकांना विकत घेतात, वाईट याचं वाटतं ते विकले जातातं. ड्रग्जमधल्या एका आरोपीला भाजपने तिकीट दिलं. तुमच्या नाकावर टिचून. लहान मुलीच्या वरती बलात्कार केलेल्या माणसाला नगरसेवक केलं. ही मस्ती हा माज वेड्यावाकड्या पद्धती सत्तेत येतो ना तेव्हा येतो. अख्खी मुंबई विकायला काढली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.