मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील महत्त्वाच्या प्रश्नाकडे सरकारचं लक्ष वेधलं आहे. महाराष्ट्रात लहान मुलं पळवण्याचं, ती बेपत्ता होण्याचं प्रमाण वाढतं असल्याच्या संदर्भातील पत्र त्यांनी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलं आहे. हे पत्र त्यांनी सोशल मीडियावर शेअर केलं आहे. एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार राज्यात लहान मुलं बेपत्ता होण्याचं प्रमाण 2021 ते 2024 या काळात जवळपास 30 टक्क्यांनी वाढलं असल्याची धक्कादायक माहिती त्यांनी या पत्रात नमूद केली आहे.
प्रति,
श्री. देवेंद्र फडणवीस,
मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, सस्नेह जय महाराष्ट्र,
एका अत्यंत महत्वाच्या आणि गंभीर विषयाकडे तुमचं लक्ष वेधून घेण्यासाठी हे लिहीत आहे. महाराष्ट्रात लहान मुलं पळवण्याचं, ती बेपत्ता होण्याचं प्रमाण वाढतं आहे. एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार जरी गेलं… — Raj Thackeray (@RajThackeray) December 13, 2025
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.