मुंबई : मुंबई महानगर क्षेत्रात अर्थात एमएमआरमध्ये पावसाने जोर धरला आहे. सखल भागात पाणी साचले आहे. मुंबई उपनगरीय रेल्वेची वाहतूक मंदावली आहे. रस्ते वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. शनिवार असल्यामुळे अनेकांना सुटी आहे. पण सकाळीच कामावर निघालेल्यांची पंचाईत झाली. दिवसभर पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. यामुळे शक्य असल्यास घरी थांबा, बाहेर पडणे टाळा; असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
शनिवार – रविवारच्या सुटीचा विचार करुन पर्यटनासाठी निघालेले पावसाने सुखावले. मुंबई जवळच्या काही पर्यटन स्थळांवर पर्यटकांना बंदी आहे. अलिकडेच झालेल्या दुर्घटनांमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. पर्यटकांनी नियमांचे पालन करावे आणि सहकार्य करावे; असे आवाहन प्रशासनाने केले आहे. नवी मुंबई येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत पाणी साचले आहे. यामुळे बाजार समितीतल्या कामकाजावर परिणाम झाला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.