राहुल गांधींच्या अमेरिकेतील कार्यक्रम घडला प्रकार

राहुल गांधींच्या अमेरिकेतील कार्यक्रम घडला प्रकार

मुंबई, २ जून २०२३, प्रतिनिधी : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या अमेरिका दौर्‍यात खलिस्तान समर्थकांकडून घोषणाबाजी करण्यात आली. एका कार्यक्रमात राहुल गांधी परदेशी भारतीयांना संबोधित करत असताना, काही जणांनी कार्यक्रमात घोषणा देण्यास सुरुवात केली. एवढेच नाही तर, त्यांनी तेथे खलिस्तानी ध्वजही फडकविला.

राहुल गांधी अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यात एका कार्यक्रमाला संबोधित करत होते. त्यानंतर प्रेक्षकांमधील काही लोकांनी १९८४ च्या शीखविरोधी दंगलीच्या संदर्भात त्यांच्या आणि गांधी कुटुंबाविरोधात घोषणाबाजी सुरू केली. मात्र, या घोषणांना उत्तर देताना राहुल गांधींनी, द्वेषाला आम्ही प्रेमानेच उत्तर देऊ, अशी प्रतिक्रिया दिली.

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी भारत जोडोची घोषणा दिली. राहुल यांनी कार्यक्रमादरम्यान सांगितले की, काँग्रेस पक्षाची मनोरंजक गोष्ट म्हणजे आम्ही सर्वांवर प्रेम करतो. जर कोणी येऊन काही बोलू इच्छित असेल, तर ते ऐकून आम्हाला आनंद होतो. आम्ही रागावणार नाही, आक्रमक होणार नाही. आम्ही त्यांचे ऐकून घेऊ, खरेतर आपण त्यांच्यावर प्रेम करू. कारण तो आपला स्वभाव आहे.

भाजप नेते भाजप नेते अमित मालवीय यांनी या घटनेशी संबंधित एक व्हिडिओ सोशल मीडियावर टाकत लिहिले की, राहुल गांधींच्या अमेरिकेतील कार्यक्रमादरम्यान 1984 च्या शीख नरसंहारावर गदारोळ झाला होता, जो काँग्रेसने पसरवला होता. द्वेषाची अशी आग पेटवली होती, जी आजपर्यंत विझलेली नाही, असे म्हटले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version