काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी वारंवार केलेल्या विधानामुळे राजकीय वातावरण तापलेले होते. मात्र आता शरद पवारांच्या मध्यस्थीमुळे राहुल गांधी यापुढे सावरकरांवर बोलणार नाहीत. अशी भुमिका स्पष्ट केल्याचे समजते आहे. राहुल गांधी यांनी केलेल्या विधानामुळे महाविकास आघाडीत असलेल्या उद्धव ठाकरे यांची कोंडी झाल्याची स्थिती आहे. सोमवारी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी विरोधी नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत राहुल गांधी आणि् शरद पवार दोन्ही नेते उपस्थित होते.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सावरकरणावर केलेल्या विधानामुळे महाविकास आघाडीतील वातावरण चांगलेच तापले आहे. अशामध्ये आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीदेखील सावरकरांच्या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली आहे. “स्वातंत्र्यवीर सावरकर आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा संबंध नाही. सावरकरांना माफीवीर म्हणणेही योग्य नाही,” असे मत त्यांनी मांडले आहे. तसेच, भाजपवर मात करायची असेल तर विरोधी पक्षांमध्ये फूट पडायला नको, अशी भूमिका महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये घेतली असल्याचे सांगण्यात येत आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.