Rahul Gandhi: ज्येष्ठ नागरिकांचे राहुल गांधींच्या विरोधात पत्र; निवडणूक आयोगाच्या विरोधातील टीकेवर व्यक्त केली नाराजी

माजी न्यायाधीश, माजी सैन्य अधिकारी आणि निवृत्त नोकरदारांनी राहुल गांधींवर निराधार आरोप, भडकाऊ भाषा आणि संस्थांना दुर्बळ करण्याचा आरोप केला आहे.
Rahul Gandhi: ज्येष्ठ नागरिकांचे राहुल गांधींच्या विरोधात पत्र; निवडणूक आयोगाच्या विरोधातील टीकेवर व्यक्त केली नाराजी

नवी दिल्ली: देशातील 272 ज्येष्ठ आणि सुजाण नागरिकांनी काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर टीका करणारे एक खुले पत्र प्रसिद्ध केले आहे. या हस्ताक्षरकर्त्यांमध्ये 16 माजी न्यायाधीश, 123 निवृत्त नोकरदार (यामध्ये 14 माजी राजदूतांचा समावेश आहे) आणि 133 माजी सैन्य अधिकारी आहेत. या पत्राचे शीर्षक ‘राष्ट्रीय संवैधानिक संस्थांवर हल्ला’ असे आहे. पत्रात म्हटले आहे की, “आम्ही नागरी समाजातील वरिष्ठ नागरिक आहोत आणि भारतातील लोकशाहीवर निर्माण झालेल्या धोक्याबद्दल गंभीर चिंता व्यक्त करतो. आज लोकशाहीवर हल्ले शस्त्राने नाही, तर विषारी आणि भडकाऊ भाषेने केले जात आहेत. काही राजकीय नेते धोरणांवरील खरी चर्चा टाळून अनाठायी, उत्तेजक आरोप करून नाट्यमय राजकारण करत आहेत.”

'निवडणुक आयोगावर नियोजित हल्ले होत आहेत’

पत्रात पुढे लिहिले आहे की, “राहुल गांधी यांनी आधी भारतीय सैन्याच्या शौर्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केले. त्यानंतर न्यायव्यवस्थेची निष्पक्षता पुसली. मग संसद आणि तिथल्या संवैधानिक अधिकाऱ्यांवर टीका केली. आणि आता ते निवडणूक आयोगालाही लक्ष्य करत आहेत. निवडणूक आयोगाच्या प्रामाणिकपणावर आणि कार्यावर नियोजित पद्धतीने हल्ले केले जात आहेत.” हस्ताक्षरकर्त्यांनी पत्रात नमूद केले आहे की, “राहुल गांधी म्हणतात की त्यांच्या हातात निवडणूक आयोगाविरोधात ‘पक्के पुरावे’ आहेत. ते असा दावा करतात की हे पुरावे ‘100 टक्के सत्य’ आहेत. त्यांनी याला ‘परमाणु बॉम्ब’ अशी उपमा दिली आहे. त्यांच्या मते, हे उघड झाले तर आयोग कुठेही लपू शकणार नाही.”

हेही वाचा:  India Security Concerns: मुस्लिम राष्ट्रांनी भारताविरुद्ध कुरघोडी! तुर्की–कतार आणि पाकिस्तानची भारतविरोधी एकजूट?

पत्रात हेही नमूद केले आहे की, राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगातील सर्व अधिकाऱ्यांना धमकीही दिली आहे. “त्यांनी म्हटले की, निवडणूक आयोगामधील वरपासून खालपर्यंत जे कोणी या कथित प्रकरणात सामील आहेत, त्यांना ते सोडणार नाहीत. त्यांनी आयोगाला देशद्रोही म्हणणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्त निवृत्त झाले तरी ते त्यांचा टिका करत राहतील, असेही त्यांनी सांगितले. तरीसुद्धा त्यांनी आजपर्यंत कोणतीही औपचारिक तक्रार दाखल केलेली नाही किंवा कोणतेही पुरावे सादर केलेले नाहीत.”

272 ज्येष्ठ नागरिकांनी असेही म्हटले की, “पुरावे नसताना आरोप करणे आणि सरकारी अधिकाऱ्यांना धमकावणे चुकीचे आहे. अशा प्रकारची भाषा, तसेच निराधार आरोप संवैधानिक संस्थांना दुर्बळ करतात आणि लोकशाहीसाठी धोकादायक ठरतात.”  राहुल गांधी सातत्याने EVM आणि निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत त्यामुळे हे पत्र लिहले गेले आहे.

हेही वाचा:  PM Narendra Modi : बंगालमध्ये भाजपासाठी विजय असंभव; पंतप्रधान मोदींकडून पश्चिम बंगालच्या मंत्र्यांचं ‘चॅलेंज एक्सेप्टेड’

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version