Pune News: धक्कादायक! MIDCमध्ये गॅस गळती; दोघांचा मृत्यू, तिघेजण गंभीर जखमी

कंपनीच्या प्लांटमध्ये अचानक झालेल्या कार्बन डायऑक्साइड  गॅस गळतीमुळे दोन कामगारांचा गुदमरून दुर्दैवी मृत्यू झाला, तर अन्य तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. 
Pune News: धक्कादायक! MIDCमध्ये गॅस गळती; दोघांचा मृत्यू, तिघेजण गंभीर जखमी

मावळ तालुक्यातील तळेगाव एमआयडीसी परिसरातील नामांकित शाफ्लेप  कंपनीत आज एका भयानक दुर्घटना घडली आहे. कंपनीच्या प्लांटमध्ये अचानक झालेल्या कार्बन डायऑक्साइड  गॅस गळतीमुळे दोन कामगारांचा गुदमरून दुर्दैवी मृत्यू झाला, तर अन्य तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. 

या घटनेमुळे संपूर्ण औद्योगिक क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली असून कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या दुर्घटनेत मृत्यू झालेले दोन्ही कामगार तरुण होते. तर जखमींवर सध्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. गौरीशंकर शर्मा , वैभव थोरात अशी मृत कामगारांची नावे आहेत. तर श्रीकृष्ण साहू, गणेश उंबरे , नरसिंह पाटील अशी जखमींची नावे आहेत.

समोर आलेल्या माहितीनुसार, दुपारच्या सुमारास गॅस यंत्रणेतून मोठ्या प्रमाणावर कार्बन डायऑक्साइडची गळती झाली. काही क्षणांतच परिसरातील ऑक्सिजनचे प्रमाण घटल्याने कामगारांना श्वास घेण्यास अडचण निर्माण झाली. या दुर्घटनेत पाच कामगार गॅसच्या संपर्कात आले. त्यापैकी गणेश उंबरे आणि वैभव थोरात हे दोघे घटनास्थळीच बेशुद्ध पडले. शरीरात मोठ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साइड गेल्याने आणि पुरेसा ऑक्सिजन न मिळाल्याने त्यांचा गुदमरून दुर्दैवी मृत्यू झाला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version