रामनवमीचा उत्साह आज सर्वत्र पाहायाला मिळत आहे. सर्वच ठिकाणी मोठ्या उत्साहात राम नवमी साजरी करण्यात येणार आहे. अशातच आता पुण्यातील वाहतूक नियमात बदल करण्यात आले आहेत. याबद्दलची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली आहे. राम नवमीनिमित्ताने शहरात विविध संघटना आणि राजकीय पक्षांकडून मिरवणूक तसेच विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहेत.या सगळ्यामुळे वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी ही उपाययोजना करण्यात आली आहे.
प्रामुख्याने पुण्यातील बाजीराव रोड आणि लष्कर परिसरातील रस्त बंद राहणार आहेत. पुण्यातील बाजीराव रोड आणि लष्कर परिसरातील रस्ते बंद राहणार आहेत. दुपारी 4 ते रात्री 10 वाजेपर्यंत या वाहतूक व्यवस्थेवर परिणाम होणार असून पुण्यातील काही रस्ते बंद राहणार आहेत.
लष्कर विभागतील वाय जंक्शन येथे वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच एम.जी.रोडवरील वाहतूक 15 ऑगस्ट चौकातून उजवी/डावी वळविण्यात येईल. महंमद रफी चौकानंतरची वाहतूक ईस्ट स्ट्रीटमार्गे वळविण्यात येईल. त्याचप्रमाणे कोहिनूर हॉटेल परिसरातून जाणारी वाहतूक भोपळे चौक व इतर पर्यायी मार्गांनी वळविण्यात येणार.
हेही वाचा – IPL 2026 : 14 वर्षाचा पठ्ठ्याचं थेट 'कॅप्टन कूल'च्या संघाला ओपन चॅलेंज, म्हणाला "दोन्ही सामन्यात सीएसकेला…"
बाजीराव रोड परिसरात पुरम चौकातून शिवाजीनगरकडे जाणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात येणार आहे. मात्र, पर्यायी मार्गाची व्यवस्थाही करण्यात आली आहे. पर्यायी मार्ग म्हणून टिळक रोड,अलका टॉकीज चौक, खंडोजी बाबा चौक मार्गे वाहतूक वळविण्यात येईल.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.