शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला लाल महालात दीपोत्सवाचे आयोजन

शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला लाल महालात दीपोत्सवाचे आयोजन

बुधवारी १९ फेब्रुवारीला राज्यासह देशाभरात मोठ्या उत्साहात शिवजयंची साजरी करण्यात येणार आहे. दरम्यान पुण्यात शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला दीपोत्सावाचे आयोजन करण्यात आलं.

तसेच लाल महालात विद्युत रोषणाई करण्यात आली.

बाल शिवबा आणि राजमाता जिजाऊ यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आलं. तसेच अभिवादन देखील करण्यात आलं.

यावेळेस परिसरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. यावेळी लाल महाल परिसरात दीप प्रज्वलन करण्यात आलं.

दीप प्रज्वलनाने लाल महाल उजळून गेला होता. छत्रपती शिवाजी महाराज की जय जय जिजाऊ जय शिवराय, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.

यामुळं शिवशाही अवतरल्याचा चित्र पाहायला मिळत होत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version