Pune Gas Cylinder News : पुन्हा वाढला नोंदणीचा कालावधी! तसेच पुण्यातील ‘या’ लोकांना मिळणार नाही गॅस सिंलिंडर, प्रशासनाचा मोठा निर्णय

गॅस सिलिंडरचा पुरवठा बंद करण्याचा निर्णय गॅस कंपन्यांनी घेतला आहे.
Pune Gas Cylinder News : पुन्हा वाढला नोंदणीचा कालावधी! तसेच पुण्यातील ‘या’ लोकांना मिळणार नाही गॅस सिंलिंडर, प्रशासनाचा मोठा निर्णय

आखाती देशांच्या युद्धाची झळ आता जगाला बसू लागली आहे. भारतात गॅसच्या किंमती वाढणार असल्याचे समोर आले. त्याप्रमाणे व्यावसायिक सिलेंडरच्या किंमतीमध्ये वाढ झालेलीदेखील बघायला मिळत आहे. अशातच आतापासून KYC (केवायसी) प्रक्रिया पूर्ण नसलेल्या ग्राहकांना गॅस सिलिंडरचा पुरवठा बंद करण्याचा निर्णय गॅस कंपन्यांनी घेतला आहे.

त्याचप्रमाणे, केवायसीसोबतच गॅस वितरणाबाबत आणखी एक मोठा बदल करण्यात आला आहे. आता दोन सिलिंडर बुक करण्यामधील कालावधी 21 दिवसांवरून थेट 30 दिवसांपर्यंत वाढवण्यात आला आहे. या नियमामुळे ग्राहकांच्या प्रतीक्षा कालावधीत आठ दिवसांची वाढ झाली असून, याचा थेट परिणाम गॅसच्या उपलब्धतेवर होणार आहे.

हेही वाचा – Ladki Bahin Yojana Update : लाडक्या बहीणींनो आता उरले फक्त 20 दिवस, अन्यथा 1500 रूपये विसरा कारण… 

नागरिकांनी गॅसचा वापर काटकसरीने करावा आणि आपल्या जवळच्या वितरकाकडे जाऊन तातडीने केवायसी अपडेट करून घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे. कच्च्या तेलाच्या किमती आणि पुरवठ्यातील अनिश्चिततेमुळे एलपीजी सिलिंडरच्या उपलब्धतेवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

हेही वाचा – JEE Advanced Exam 2026: इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी; 'जेईई ॲडव्हान्स 2026' चे वेळापत्रक जाहीर; 'या' तारखेला होणार परीक्षा 

कच्च्या तेलाच्या किमती आणि पुरवठ्यातील अनिश्चिततेमुळे एलपीजी सिलिंडरच्या उपलब्धतेवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 
 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version