Pune Bogus Doctor : रुग्णांची मोठी फसवणूक ! पुण्यातील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये बोगस महिला डॉक्टरचा पर्दाफाश

तक्रारदार सिया मुकेश शोकिंदे यांनी २० जानेवारी रोजी पोलिस आयुक्त कार्यालयात याप्रकरणी तक्रार दाखल केली. 
Pune Bogus Doctor : रुग्णांची मोठी फसवणूक !  पुण्यातील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये बोगस महिला डॉक्टरचा पर्दाफाश

पुण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.  पुण्यातील प्रतिष्ठित सह्याद्री हॉस्पिटलमध्ये बोगस महिला डॉक्टरचा पर्दाफाश करण्यात आलाय. वैष्णवी प्रशांत मंत्रवादी असं नाव सांगून ही बोगस महिला डॉक्टर रुग्णांची फसवणूक करायची. अनेक रुग्णांवर तिने अशी खोटी ओळख सांगून उपचारही केल्याचा गंभीर प्रकार समोर आलाय. तक्रारदार सिया मुकेश शोकिंदे यांनी २० जानेवारी रोजी पोलिस आयुक्त कार्यालयात याप्रकरणी तक्रार दाखल केली. 

संबंधित बोगस डॉक्टर महिलेकडे कोणतीही वैद्यकीय पदवी नसल्याचं स्पष्ट झालंय.  आता या प्रकरणाची दखल पुणे महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त डॉ. राजेश शिंदे यांनीही घेतली असून त्यांनी चौकशीचे आदेश दिलेत. याप्रकरणी विशेष चौकशी समितीही नेमण्यात आलीये. या प्रकरणाविरोधात आरपीआय नेते रस्त्यावर उतरले असून लवकर कारवाईचीही मागणी केली आहे आणि आरोग्य विभागानेही लवकरच कठोर कारवाईचं आश्वासन दिलं आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version