प्रा. हरी नरके काळाच्या पडद्याआड

प्रा. हरी नरके काळाच्या पडद्याआड

मुंबई, ज्येष्ठ लेखक, विचारवंत, समता परिषदेचे उपाध्यक्ष आणि ब्लॉगर प्रा. हरी नरके यांचे निधन झाले. एशियन हार्ट हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्राध्यापक हरी रामचंद्र नरके ६० वर्षांचे होते. ते पुणे विद्यापीठात प्राध्यापक आणि महात्मा फुले अध्यासनाचे प्रमुख म्हणून कार्यरत होते. तसेच महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य म्हणून काम करत होते.

प्राध्यापक नरके समता परिषदेशी संबंधित कामांसाठी पुणे येथून मुंबईसाठी रवाना झाले होते. मुंबईत येत असताना त्यांची तब्येत ढासळली. त्यांना तातडीने एशियन हार्ट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

प्राध्यापक हरी नरके यांनी विपुल लेखन केले. त्यांची महात्मा फुले यांची बदनामी : एक सत्यशोधन आणि महात्मा फुले – शोधाच्या नव्या वाटा ही पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्यांनी सामाजिक विषयांवर अनेक वर्षे ब्लॉग लिहिले. अनेक वृत्तपत्रांतून आणि मासिकांतून त्यांनी लिखाण केले.

मराठा आरक्षणाला विरोध केल्यामुळे प्राध्यापक नरके चर्चेत आले. मराठा आणि कुणबी हे दोन्ही एकच आहेत की स्वतंत्र आहेत यावरून वाद सुरू झाला. हरी नरके यांनी फुले-आंबेडकर कोश लिहिण्याचे काम हाती घेतले होते. त्यांच्या निधनामुळे हे काम अपूर्ण राहिले. डॉ. आंबेडकरांच्या साहित्याचे २६ शासकीय खंड प्रसिद्ध झाले आहेत. यातील ६ खंडांचे संपादन नरके यांनी केले होते.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version