नवी दिल्ली : वारंवार निवडणुकांमधून अपेक्षित यश मिळत नसल्यामुळे काँग्रेसने भाकरी फिरवली आहे. राहुल गांधींच्या नेतृत्वात निवडणुका लढणाऱ्या काँग्रेसने आता प्रियांका रॉबर्ट वाड्रा यांना पुढे करून राजकारणात नवी सुरुवात करण्याची तयारी सुरू केली आहे. प्रियांका वाड्रा वायनाड लोकसभा मतदारसंघातून पोटनिवडणूक लढणार आहेत.
राहुल गांधी केरळमधील वायनाड आणि उत्तर प्रदेशमधील रायबरेली या दोन लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले आहेत. आता राहुल यांनी वायनाडची जागा सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या जागेवरून प्रियांका लोकसभेची पोटनिवडणूक लढणार आहेत.
राष्ट्रीय राजकारणात आता एकाचवेळी तिसरा गांधी दिसणार आहे. राहुल यांनी वायनाडकरांना ठेंगा दाखवला आहे. या जागेवरून निवडणूक लढवत प्रियांका गांधी वाड्रा राष्ट्रीय राजकारणात येण्याच्या प्रयत्नात आहेत.
महत्त्वाचे मुद्दे
कोण आहे प्रियांका ?
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.