पंतप्रधान नरेंद्र मोदी लाओसला रवाना

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी गुरूवारपासून लाओसमधील व्हिएंनटाइनच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर रवाना झाले  आहेत.  
पंतप्रधान नरेंद्र मोदी लाओसला रवाना

मुंबई : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी गुरूवारपासून लाओसमधील व्हिएंनटाइनच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर रवाना झाले  आहेत.  पंतप्रधान मोदी एकविसाव्या आसियान-भारत शिखर परिषदेत आणि एकोणिसाव्या पूर्व आशिया शिखर परिषदेला उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान दहाव्यांदा आसियान-भारत शिखर परिषदेत उपस्थित आहेत. पूर्व प्रथम या धोरणाची दशकपूर्ती होत असताना ही परिषद महत्त्वपूर्ण असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. भारत-प्रशांत महासागर क्षेत्रातील शांतता, स्थिरता आणि समृद्धी यांच्यावर परिषदेत विचार केला जाईल, असं त्यांनी म्हटलं आहे. 

 

 

 

 

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version