Pratap Sarnaik : परिवहन मंत्र्यांचा परळ डेपो दौरा,कर्मचारी मात्र ‘फुल्ल तर्राट’, थेट कारवाईचे आदेश, नेमकं काय काय घडलं?

दारू पिऊन असलेला चालक आढळल्यानंतर प्रताप सरनाईक यांना राग अनावर झाला.
Pratap Sarnaik : परिवहन मंत्र्यांचा परळ डेपो दौरा,कर्मचारी  मात्र  ‘फुल्ल तर्राट’, थेट कारवाईचे आदेश, नेमकं काय काय घडलं?

राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी नुकताच परळ डेपोमध्ये भेट दिली. यावेळी त्यांच्यासमोर एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पाहाणी करताना एक वाहन चालक दारू पिऊन आढळला. त्यावेळी प्रताप सरनाईक यांनी तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले. दारू पिऊन असलेला चालक आढळल्यानंतर प्रताप सरनाईक यांना राग अनावर झाला.  सदर वाहन चालकाला ताबडतोब सस्पेंड करण्याचे दिले आदेश देण्यात आलेले आहेत. 

त्याचप्रमाणे, परळ डेपोमध्ये परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना सापडल्या दारूचा बाटल्या देखील निदर्शनास आल्या. साधारणतः दहा ते बारा दारूच्या बाटल्या सापडल्या.   प्रताप सरनाईक परळ डेपोच्या सर्व अधिकार्‍यांवर जोरदार कडकडले.  

कारवाईचे आदेश : 
वाहनचालक आणि कंडक्टर यांना चांगल्या सोयी सुविधा मिळाव्या म्हणून आम्ही सभागृहात भांडतो आणि तिथे हे लोक असे दारू पितात प्रताप सरनाईक यांचा अधिकाऱ्यांशी बोलताना मोठं वक्तव्य केलं आहे. ताबडतोब अल्कोहोल डिटेक्टर मशीन आणा सगळ्यांची अल्कोहोल टेस्ट होईल आणि पॉझिटिव्ह सापडला तर त्याला गाडीवर न बसू देणे आणि बस स्थानकात सीसीटीव्ही कार्यान्वित करण्याचे, गरज भासल्यास नवे सीसीटीव्ही तात्काळ पाहण्याचे आदेशदेखील  प्रताप सरनाईक यांनी परिवहन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले आहेत. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version