प्रकाश आंबेडकरांनी ‘महाराष्ट्र बंद’ घेतला मागे

प्रकाश आंबेडकरांनी ‘महाराष्ट्र बंद’ घेतला मागे

वंचित बहुजन आघाडीने पुकारलेला महाराष्ट्र बंद यशस्वी झाला आहे. आता जनजीवन सुरळी व्हावं यासाठी आम्ही बंद मागे घेत आहोत, असं म्हणत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंद मागे घेत असल्याचं जाहीर केलं.

काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?

आजच्या ‘महाराष्ट्र बंद’साठी आम्ही कोणावरही जबरदस्ती केली नव्हती.

या बंदमध्ये कोणत्याही प्रकारचा हिंसाचार झालेला नाही.

घाटकोपरला झालेल्या दगडफेकीत आमचे कार्यकर्ते नव्हते. ज्यांनी दगडफेक केली, त्यांचा चेहरा झाकलेला होता. आमच्या कार्यकर्त्यांना चेहरा न झाकण्याच्या आमच्या सूचना होत्या.

तसंच बजरंग दल आणि भाजपाने या महाराष्ट्र बंदला विरोध करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आंबेडकर यांनी केला.

मुंबईवर ‘बंद’चा परिणाम झाला का?

मुंबईमध्ये या महाराष्ट्र बंदचा फारसा प्रभाव पडला नाही. मात्र यासंदर्भात विचारं असता दादरच्या ‘कपडा बाजार’ येथे दररोज काहीशे कोटींचा व्यवहार होतो, मात्र आज 50 कोटींचाही व्यवहार झाला नाही. याचा अर्थ मुंबईमध्ये महाराष्ट्र बंद यशस्वी झालाय.

वंचित बहुजन आघाडीने CAA आणि NRC विरोधात पुकारलेल्या या बंदला 100 संघटनांनी पाठिंबा दिल्याचंही त्यांनी म्हटलं. तसंच अमरावतीत कार्यकर्त्यांवर झालेला लाठीचार्ज चुकीचा असल्याचं कळल्यावर पोलिसांनी त्यांना सोडून दिल्याचं आंबेडकर यांनी स्पष्ट केलं.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version