पोलीस उपनिरीक्षकास 4 लाखांची लाच घेताना रंगेहाथ अटक

पोलीस उपनिरीक्षकास 4 लाखांची लाच घेताना रंगेहाथ अटक

पोलीस निरीक्षकाला ४ लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. लाच घेताना अटक करण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव ज्ञानेश्वर दळवी असं आहे.

अटक करण्यात आलेले पोलीस उपनिरक्षिक हे फलटण शहर पोलीस ठाण्यात कार्यरत होते.

तक्रारदाराच्या मामाच्या मुलाला एका गुन्ह्यामध्ये आरोपी न करण्यासाठी २० लाखांची मागणी या पोलिस उपनिरीक्षकाने केली होती.

लाच मागितल्याची तक्रार सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागात करण्यात आली. या तक्रारीनुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला.

आणि यानुसार या पोलीस उपनिरिक्षकाला लाच घेताना रंगेहाथ अटक केली. सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version