दरेकरांना पुन्हा पोलिसांची नोटीस

दरेकरांना पुन्हा पोलिसांची नोटीस

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना मुंबै बँक प्रकरणी पोलिसांनी पुन्हा नोटीस बजावली आहे. तसेच ११ एप्रिल रोजी दरेकरांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेशही पोलिसांनी दिले आहेत.

प्रवीण दरेकर मजूर नसतानाही याच प्रवर्गातून मुंबै बँकेच्या संचालकपदी निवडणूक लढवून २० वर्षे सरकारीच फसवणूक केली असल्याचा आरोप प्रवीण दरेकर यांच्यावर करण्यात आला आहे. दरम्यान, याप्रकरणी प्रवीण दरेकर यांना पुन्हा पोलिसांनी नोटीस बजावली आहे. तसेच माता रमाबाई आंबेडकर पोलीस ठाण्यात हजार राहण्याच्या सूचनाही त्यांना देण्यात आल्या आहेत.

मुंबै बॅँक प्रकरणी प्रवीण दरेकर यांना दुसऱ्यांदा नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच आता याप्रकरणी त्यांना ११ एप्रिल रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेशही त्यांनी देण्यात आले आहेत.

काय आहे प्रकरण?

प्रवीण दरेकर यांनी मुंबै जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत मजूर वर्गातून निवडणूक लढवल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. प्रवीण दरेकर यांची बँकेवर संचालक म्हणून बिनविरोध निवड झाली होती. मात्र, सहकार विभागाने प्रवीण दरेकर यांना मजूर म्हणून अपात्र ठरवले आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांनी प्रवीण दरेकर यांना पुन्हा नोटीस बजावली असून त्यांच्यावर माता रमाबाई आंबेडकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version