PM Modi on MP : कॅंटीनमध्ये टाइमपास, पंतप्रधानांनी खासदारांची घेतली शाळा, म्हणाले, ‘तुम्हाला संधी मिळते पण…’

त्यामुळे या प्रकरणाची चांगलीच चर्चा रंगली आहे. 
PM Modi on MP : कॅंटीनमध्ये टाइमपास, पंतप्रधानांनी खासदारांची घेतली शाळा, म्हणाले, ‘तुम्हाला संधी मिळते पण…’

सध्या लोकसभा अधिवेशन सुरू आहे. यादरम्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासदारांना चांगलेच सुनावलं आहे. चहा पिण्यासाठी कॅन्टीनमध्ये बसण्यापेक्षा सभागृहात बसा, असा संदेश त्यांनी खासदारांना दिला.त्या मिळालेल्या संधीचं सोनं करा कॅन्टीनमध्ये बसून टाईमपास करणाऱ्या खासदारांना मोदींनी फटकारले. त्यामुळे या प्रकरणाची चांगलीच चर्चा रंगली आहे. 

खासदारांच्या मुद्द्यानंतर राहुल गांधींच्या भाषणाचा मुद्दादेखील चांगलाच रंगला आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना लोकसभेत बोलण्यापासून रोखण्यात आले तेव्हा विरोधी पक्षाच्या खासदारांनी गोंधळ सुरूच ठेवला.ज्यसभेतही राहुल गांधींच्या भाषणाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. 

हेही वाचा – Stock Market Today: सेन्सेक्स 83 हजारांच्या खाली? निफ्टीही गडगडला; वाचा शेअर बाजारातील पडझडीचे नेमके कारण काय? 

संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी लोकसभा अध्यक्ष खरगे यांना सांगितले की, चार दिवस झाले आहेत. राहुल गांधी नियमांचे पालन करत नाहीत, तुम्ही त्यांना ते का स्पष्ट करत नाही? त्यामुळे आता संसदेत कोणत्या मुद्द्यावरून अधिक चर्चा होणार आहे याकडे सर्वांचेच अधिक लक्ष लागले आहे. 

हेही वाचा – Chandrapur Muncipal Corporation: चंद्रपूर काँग्रेसमध्ये 'ऑल इज वेल'; विभागीय आयुक्तांविरोधातील याचिका मागे, नेमकं काय घडलं?

त्याचप्रमाणे लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भाषण करता आलं नाही. त्यावरुन आता राजकीय रणकंदन माजलं आहे. या सगळ्या घटनाक्रमावरुन भाजप खासदार मनोज तिवारी आणि कंगना रणौत यांनी विरोधकांवर  विरोधी पक्षाच्या खासदारांनी लोकसभेच्या अध्यक्षांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यांना पंतप्रधानांवरही हल्ला करायचा होता गंभीर आरोप केले आहेत. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version