पाण्याच्या बहाण्याने महिलेला खोलीत बोलवून केला लैंगिक अत्याचार

पाण्याच्या बहाण्याने महिलेला खोलीत बोलवून केला लैंगिक अत्याचार

आळंदी (पुणे) : खेड तालुक्यात महिलेला खोलीवर बोलवून जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पीडित महिलेनं आळंदी पोलीस ठाण्यात रविवारी तक्रार नोंदवली आहे. मन्नु धिरेंद्र मलिक असे आरोपीचे नाव असून या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपीने पीडितेला पाणी घेऊन रुममध्ये बोलवले. त्यानंतर पीडिता पाणी घेऊन रुममध्ये आली. आरोपीने दार बंद करून पीडितेशी जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तसेच, याबाबत कुणाला सांगितले तर तुला व तुझ्या आई वडिलांना जीवे मारून टाकीन, अशी धमकीही दिल्याचं या फिर्यादीत पीडितेने म्हटले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version