‘पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत घट झाली कारण…’ – संजय राऊत

‘पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत घट झाली कारण…’ – संजय राऊत

  इंधनावरील अबकारी कर कमी करण्याचा महत्वाचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना महागाईपासून दिलासा मिळाला असन पेट्रोल ५ रुपये आणि डिझेल १० रुपयांनी स्वस्त झाले आहे. या निर्णयामुळे ठाकरे सरकारन इंधनावरील कर कधी कमी करणार, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. देशात पोटनिवडणुकांमध्ये भाजप हरल्यामुळे केंद्रसरकारने हा निर्णय घेतल्याचे संजय राऊत म्हणाले.

 संजय राऊत म्हणाले, ‘पेट्रोल डिझेलचे भाव वाढण्यास केंद्र सरकारच जबाबदार आहे. त्यामुळे इंधनावरील वाढते भाव यासाठी मोदी सरकारकडेच बोट दाखवावे लागेल. हिमाचलचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर हे भाजपचे मुख्यमंत्री यांनीही केंद्राकडेच बोट दाखवले आहे. मग त्यांची बोटे छाटणार का?’ असा सवाल राऊतांन उपस्थित केला आहे.

  ‘पेट्रोल फक्त ५ रुपयांनी स्वस्त करणे ही जनतेची चेष्ठा आहे. आधी पेट्रोलचे भाव शंभरीवर न्यायचे आणि त्यानंतर ५ रुपयांनी कमी करायचे. हे मोठ्या मनाचे लक्षण नाही. कुजक्या आणि सडक्या मनाचे लक्षण आहे. पेट्रोलचे दर किमान २५ ते ५० रुपयांनी स्वस्त व्हायला हवे होते’, असे संजय राऊत म्हणाले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version