वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणीसंग्रहालयातील पेंग्विनची देखभाल महागली आहे. पेंग्विनच्या तीन वर्षाच्या देखभालीसाठी १६ हजार कोटी रुपयांचा प्रस्ताव मुंबई महापालिकेत मंजूर करण्यात आला आहे. पेंग्विनचा देखभालीचा खर्च दररोज ३३ हजारांनी वाढला आहे.
मुंबईतील राणीबागेत २०१७मध्ये पेंग्विन आणल्यानंतर ११ कोटी रुपयांचा देखभाली खर्च मंजूर करण्यात आला होता. हा कंत्राट कालावधी संपल्यानंतर आता पेंग्विनच्या देखभालीसाठी नवा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. पेंग्विनच्या देखभालीसाठी आता तीन वर्षाला १६ कोटींचा खर्च मंजूर करण्यात आला. मुंबई महापालिकेत हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. मात्र, महापालिकेतील मंजूर प्रस्ताव आता वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.
मुंबईतील पेंग्विनची देखभाल महागल्यामुळे भाजप स्थायी समितीमध्ये निदर्शने करण्यात आली. कोरोना काळात महापालिकेच्या आर्थिक परिस्थितीवर मोठा परिणाम झाला. अशातच पेंग्विनची देखभाल करण्याच्या खर्चिक प्रस्तावाला मंजूरी मिळाल्यामुळे हा प्रस्ताव वादात सापडला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.