राज्य विधिमंडळांच्या हिवाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. दरम्यान आज विधानसभेत विधानसभा अध्यक्ष निवडणुकीची तारीख जाहीर झाली आहे. राज्यातील विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक येत्या २७ आणि २८ डिसेंबर रोजी होणार आहे. याबाबतची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. त्यामुळे आता नाना पटोले यांना अध्यक्षपदी काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण हवे आहेत का? असा सवाल उपस्थित होत आहे.
विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसला विधानसभा अध्यक्ष मिळेल का? अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच अध्यक्षपदासाठी संग्राम थोपटे आणि पृथ्वीराज चव्हाण यांची नावे समोर येत आहेत. त्यामुळे नाना पटोले यांना विधानसभा अध्यक्षपदी पृथ्वीराज चव्हाण हवे आहेत का? असा सवाल उपस्थित होत आहे.
विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीबाबत राज्यापालांकडे पत्र पाठवण्यात आले असल्याची माहिती नाना पटोले यांनी दिली आहे. त्यामुळे राज्यपालांच्या मान्यतेनंतर निवडणूक प्रक्रिया सुरू होणार असल्याची अपेक्षा वर्तवण्यात येत आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.