पालकांनी मुलांवर अपेक्षांचे ओझे टाकू नये – मोदी

पालकांनी मुलांवर अपेक्षांचे ओझे टाकू नये – मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘परिक्षे पे चर्चा’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून बोर्डाच्या परिक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांशी आणि त्यांच्या पालकांशी संवाद साधला. दिल्लीतील तालरकोटा स्टेडियम मधून पंतप्रधान मोदी परिक्षांसंदर्भात मार्गदर्शन करताना दिसले. विद्यार्थ्यांच्या पालकांना संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी पालकांनी आपल्या अपेक्षांचे ओझे विद्यार्थ्यांवर टाकू नये. कुटुंबाच्या काही अपेक्षा असतील तर ते चूक नाही मात्र त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मुलांवर पालकांनी दबाव टाकू नये, असे म्हटले आहे.

त्याचबरोबर, समाजासाठी विद्यार्थ्यांवर दबाव टाकू नये, असाही सल्ला पंतप्रधान मोदींनी पालकांना दिला आहे. त्याचबरोबर, काहीजणांना वेळेचे व्यवस्थापन करण्यात अडचणी येतात. अशा विद्यार्थ्यांनी आपल्या आईकडून वेळेचे व्यवस्थापन शिकले पाहिजे. काम केल्याने कधी थकत नाही तर काम केल्याने थकवा निघून जातो असे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हटले आहे.

‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमात नरेंद्र मोदी विदयार्थी, शिक्षक आणि पालक यांच्या संवाद साधत आहे. या कार्यक्रमात देशातील २ हजार विद्यार्थी सहभागी झाले आहेत. १५५ देशातील अनेक विद्यार्थी लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत. यावेळी पंतप्रधान बोलताना म्हणाले युवक वर्ग काय विचार करतो हे महत्वाचे आहे. देशातील युवक सकारात्मक विचार करतात त्याची ध्येय, स्वप्न ही काळानुसार बदलत आहे. त्यामुळे ‘परीक्षा पे चर्चा’ ही माझीही परीक्षा असून देशातील कोट्यवधी विद्यार्थी आज माझी परीक्षा घेत आहेत. ही परीक्षा देत असताना मला आनंद होत असल्याचं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमात व्यक्त केलं आहे.

दरम्यान,या चर्चेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील ऑनलाइन पद्धतीने सहभागी झाले आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version