बीडमधील मुंडे-मेटे वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. महाजनादेश यात्रा बीड शहरात प्रवेश करताना ऐनवेळी आ.विनायक मेटेनी मुख्यमंञी देवेंद्र फडणवीस यांना अडवून यात्रेचे स्वागत बीड शहराच्या जवळ अहमदनगर – बीड रोड लगत काकडहिरा येथे केले. यावेळी पंकजा मुंडे आणि खा.प्रीतम मुंडे गाडीत बसून होत्या. त्यांनी या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. महाजनादेश यात्रेच्या सभेत प्रास्तविक करतांना मुख्यमंत्र्यांसमोर मेटेवर जहरी टीका केली.
आ.विनायक मेटेनी मुख्यमंञी देवेंद्र फडणवीस यांना हट्ट धरून महाजनादेश यात्रेचे स्वागत बीड शहराच्या जवळ अहमदनगर – बीड रोड लगत काकडहिरा या ठिकाणी महाजनादेश यात्रा गाडी अडवून स्वागत केले. यावेळी मेटेंनी शक्ती प्रदर्शन केले. विनायक मेटेंच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड घोषणाबाजी केली.
लोकसभा निवडणुकीत बीड सोडून संपूर्ण महाराष्ट्रात महायुती सोबत अशी भूमिका घेतं मुंडे भगिनींना उघड उघड जाहीर विरोध करत विनायक मेटेंनी राष्ट्रवादीला पाठिंबा दिला होता. तसेच या निवडणुकीत पंकजा मुंडेवर खालच्या दर्जाची टीका केली म्हणून बीड भाजपामध्ये मेटे विरोधात तीव्र असंतोष खदखदत होता.
या घडलेल्या सत्कार नाट्यामुळे पंकजा मुंडेनी देखील जाहीर भाषणात मेटेच्या या प्रकारवर स्पष्ट नाराजी व्यक्त करतं समाचार घेतला यावेळी मुख्यमंञी साहेब तुमचा देवेंद्र तें नरेंद्र हा प्रवास सुखाचा व्हावा अशा शुभेच्छा देताना स्व.मुंडे साहेब गेल्यानंतर तुम्हीं माझे गुरु आहात. द्रोणाचार्य यांनी अर्जुनापेक्षा कोणी वरचड होवू नये म्हणून एकलव्यचा अंगठा मागितला होता मात्र तो अर्जुनासाठी होता.मुख्यमंत्री साहेब तुमच्यासाठी मी एकलव्य होवून अंगठा द्यायला तयार आहे. पण फक्त तो अर्जुनासाठी असावा इतर कोणासाठी नाही असें म्हणत अप्रत्यक्षपणे मेटेवर शरसंधान साधले.
या घडलेल्या प्रकारावर शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष आ.विनायक मेटे यांनी प्रतिक्रिया दिली. शिवसंग्राम महायुती मधील घटकपक्ष आहे. त्यांत भाजपा हा मोठा पक्ष त्यामुळे मोठय़ा भावाचे स्वागत करणे लहानाचे कर्तव्य आहे. ते मी केले अशी टिपणी केली..
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.