Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्याबाबत मोठी अपडेट! शिक्षकचं निघाला गद्दार; ऑपरेशन महादेवमध्ये सापडला सुगावा

दक्षिण काश्मीरमधील हल्ल्यात लष्कर-ए-तोयबा दहशतवाद्यांना मदत केल्याच्या आरोपाखाली 26 वर्षीय शिक्षक मोहम्मद युसूफ कटारियाला अटक करण्यात आली आहे.
Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्याबाबत मोठी अपडेट!  शिक्षकचं निघाला गद्दार; ऑपरेशन महादेवमध्ये सापडला सुगावा

Pahalgam Attack: पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जवळपास पाच महिन्यांनी पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. दक्षिण काश्मीरमधील हल्ल्यात लष्कर-ए-तोयबा दहशतवाद्यांना मदत केल्याच्या आरोपाखाली 26 वर्षीय शिक्षक मोहम्मद युसूफ कटारियाला अटक करण्यात आली आहे. श्रीनगर पोलिसांनी कटारियाला अटक करून न्यायालयात हजर केले. त्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. 

पोलीस सूत्रांनुसार, ऑपरेशन महादेव दरम्यान मारलेल्या दहशतवाद्यांकडून जप्त केलेल्या उपकरणांमधून कटारियाचा शोध लागला. या ऑपरेशनमध्ये पहलगाम हल्ल्यासाठी जबाबदार असलेले तीन पाकिस्तानी दहशतवादी सुरक्षा दलांनी ठार केले होते. कटारियाला करण्यात आलेली अटक ही पहलगाम हल्ल्याशी संबंधित पहिली मोठी कारवाई मानली जात आहे. पोलिस कटारियाची चौकशी करत असून पुढील तपास सुरू आहे.

हेही वाचा – Karnataka HC On X Handle : कर्नाटक उच्च न्यायालयाचा 'एक्स'ला झटका; 'भारतात काम करायचे असेल तर…'

पहलगामच्या बैसरन खोऱ्यात 22 एप्रिल रोजी 26 जणांचा बळी गेला होता, ज्यात 25 भारतीय पर्यटक होते. या हल्ल्यामुळे भारत-पाकिस्तान दरम्यान तणाव निर्माण झाला. हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय सशस्त्र दलांनी 7 मे रोजी ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानमधील नऊ दहशतवादी अड्डे नष्ट केले आणि 100 हून अधिक दहशतवाद्यांना ठार केले.

हेही वाचा – Leh Ladakh Protest: लेहमध्ये आंदोलनाला हिंसक वळण; संघर्षात 4 जणांचा मृत्यू, प्रतिबंधात्मक आदेश लागू

दरम्यान, ऑपरेशन महादेवच्या शेवटच्या आठवड्यात मारले गेलेले तीन दहशतवादी पाकिस्तानचे रहिवासी होते. या हल्ल्याचा मास्टरमाइंड हाशिम मुसा उर्फ सुलेमान (रावलकोट), अबू हमजा उर्फ हॅरिस (सियालकोट) आणि मोहम्मद यासिर (पाकिस्तान) होते. आता या गटाचा एका साथीदाराला अटक झाल्यामुळे पहलगाम हल्ल्याशी संबंधित तपास अधिक प्रभावीरीत्या पुढे नेला जाऊ शकतो. तथापी, पोलिसांनी सांगितले की ही कारवाई महत्त्वाचा टप्पा असून त्यामुळे भारतातील सुरक्षा दलांच्या दहशतवादी गटांविरुद्ध प्रयत्नांना मोठी चालना मिळाली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version