येवला उपजिल्हा रुग्णालयातील ऑक्सिजन प्लांट दोन महिन्यापासून बंद

येवला उपजिल्हा रुग्णालयातील ऑक्सिजन प्लांट दोन महिन्यापासून बंद

  गेल्या काही महिन्यांत राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत होती. त्यामुळे कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, पालकमंत्री छगन भुजबळ यांनी येवला उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन प्लांटची निर्मिती केली. ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी लाखो रुपये खर्च करण्यात  आले. मात्र गेल्या दोन महिन्यापासून येवल्यातील हा ऑक्सीजन प्लांट बंद पडला आहे.

  छगन भुजबळ यांनी कोरोना रुग्णांसाठी येवल्यामध्ये ऑक्सीजन प्लांट उभारला. मात्र उभारलेला ऑक्सीजन प्लांटचे कॉरम्प्रेसर ट्रान्सफार्मरने महावितरणच्या व्होल्टेज प्रॉब्लममुळे दोन वेळा पेट घेतली. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून येवल्यातील उपजिल्हा रुग्णालयातील ऑक्सिजन निर्मिती बंद आहे. याबाबत महावितरणकडे तक्रार करण्यात आली आहे. मात्र वारंवार तक्रार करुनही महावितरण याकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे जिल्ह्यात ऑक्सिजनची गरज भासणाऱ्या रुग्णांचा जीव टांगणीला लागला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version