आषाढी यात्रेमध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वारकरी चालत येत असतात. अशा वेळी मानाच्या व परंपरांच्या वारकरी दिंड्यांना ५० हजार रुपये अनुदान द्यावे. जेणेकरून कष्टकरी शेतकरी व गरीब असणारा वारकरी मोफत पंढरपूर पर्यंत येऊ शकेल. वारकरी दिंड्यांना अनुदान जर दिले नाही तर वेळप्रसंगी वारकरी संघटना वारी दिंड्या पालख्या थांबवून आंदोलन करतील. असा इशारा वारकरी साहित्य परिषदेचे विठ्ठल पाटील यांनी दिला आहे. दिंडी अनुदानाची मागणी आता जोर धरू लागली आहे. तर, विठ्ठल पाटलांच्या या दिंडी अनुदानाच्या मागणीबाबत वारकरी सांप्रदायिक महाराज मंडळी आणि वारकऱ्यांमधून स्वागत होताना दिसत आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.