ऑपरेशन टायगर अखेर यशस्वी झाले आहे. ठाकरे यांच्या सहा खासदार यांचा एक गट बाहेर पडला असून ऑपरेशन टायगर पूर्ण झाल्याचे शिवसेनेकडून शिक्कामोर्तंब करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. काही तांत्रिक बाबी व कायदेशीर बाबींची चाचपणी शिवसेनाकडून सुरु आहेत. त्याच बरोबर ठाकरे गटकडून काय कायदेशीर पावले उचलली जातं आहेत, याकडे शिवसेनेचे लक्ष लागलं आहे.
यासर्व गोष्टी तपासून 20 किंवा 21 जूनला या महत्वाच्या निर्णयाची घोषणा शिवसेना कारणार आहे. तसेच ऑपरेशन टायगर सक्सेस करून एकनाथ शिंदे मुंबईकडे रवाना झाले असून एकनाथ शिंदे ठाण्यात दाखल झाले आहेत. तुर्तास या सहा खासदारांचा प्रवेश दोन ते तीन दिवस लाबंणीवर गेला आहे. 19 तारखेला वर्धापन दिना औपचारीक घोषणा होण्याची शक्यता वर्तावली जात आहे.
शिवसेना ही ठाकरे गटाकडून येणाऱ्या आक्षेपांवर आधी काम करणार. त्यानंतर टेक्निकल आणि कायदेशिर बाजू तपासून शिवसेना या सहा खासदारांच्या पक्ष प्रवेशाची अधिकृत घोषणा करणार असल्याचे समोर आले आहे. एकनाथ शिंदे यांना दिल्लीत ऑपरेशन टायगर यशस्वी रित्या राबवण्यात यश आलं असून शिवसेनेच्या सर्व 6 खासदारांना सुरक्षेच्या कारणास्तव दिल्लीतून बाहेर हलवल्याची सुत्रांची माहीती आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.