‘जतची उमेदवारी गोपीचंद पडळकरांनाच मिळणार’

गोपीचंद पडळकर यांच्या तिकिटाची चिंता करू नका असं म्हणत सदाभाऊ खोत पडळकरांच्या उमेदवारीचे संकेत दिले आहेत.
‘जतची उमेदवारी गोपीचंद पडळकरांनाच मिळणार’

सांगली :  विधानसभा निवडणुकीच्या तयारीला सुरूवात झाली आहे. सांगली जिल्ह्यातील राजकारणाबद्दल माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी वक्तव्य केले आहे. गोपीचंद पडळकर यांच्या तिकिटाची चिंता करू नका असं म्हणत सदाभाऊ खोत पडळकरांच्या उमेदवारीचे संकेत दिले आहेत. काही मंडळी भूमिपुत्र असल्याच्या नावाखाली गोपीचंद पडळकर या बहुजन विकास पुरुषास उमेदवारी मिळू नये म्हणून विरोध करत आहेत असे खोत यांनी म्हटले आहे.

 

यापुढे खोत म्हणाले, गोपीचंद पडळकरांच्या उमेदवारीला विरोध होत असला तरीही त्यांच्या सारख्या व्यक्तीची जत तालुक्याला गरज आहे. आमचा देवेंद्र देव मुंबईत बसलाय. त्यामुळे जतची उमेदवारी गोपीचंद पडळकरांनाच मिळणार असे वक्तव्यही सदाभाऊ खोत यांनी केले आहे.  
 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version