ब्रिटनमध्ये वेगाने वाढला ओमायक्रॉन

ब्रिटनमध्ये वेगाने वाढला ओमायक्रॉन

दक्षिण आफ्रिकेत आढळलेला कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनने जगभराची चिंता वाढवली आहे. तर दिवसेंदिवस जगभरात ओमायक्रॉन रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. ब्रिटनमध्ये ओमायक्रॉन रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असून रविवारी ब्रिटनमध्ये ८२,८८६ ओमायक्रॉन विषाणूचे रुग्ण आढळले आहेत. तर लंडनमध्येही ओमायक्रॉनचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत.

काही दिवसांपूर्वी आटोक्यात आलेला कोरोना विषाणूचा जगात पुन्हा उद्रेक पाहायला मिळत आहे. ओमायक्रॉन विषाणूची भीषणता ब्रिटन आणि अमेरिकेत सर्वाधिक आहे. त्यामुळे ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर ओमायक्रॉन विषाणूचा वाढता प्रसार रोखण्यासाठी ब्रिटनच्या सरकारने नाताळ सणानंतर दोन आठवड्यांच्या लॉकडाऊनची योजना अंमलात आणण्याचे ठरवले आहे.

भारतात ओमायक्रॉनचे १६० रुग्ण

भारतातही ओमायक्रॉन विषाणूने शिरकाव केला असून देशात एकूण १६० रुग्ण ओमायक्रॉनबाधित आहेत. तसेच महाराष्ट्रात ओमायक्रॉन विषाणूचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्रात ५४ रुग्णांना ओमायक्रॉन विषाणूची बाधा झाली आहे. तसेच भारतात सोमवारी ६५६३ नवे कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे प्रशासन चिंतेत आले असून नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version