मराठी साहित्य संमेलनावर ‘ओमिक्रॉन’चे सावट

मराठी साहित्य संमेलनावर ‘ओमिक्रॉन’चे सावट

दक्षिण आफ्रिकेत कोरोना विषाणूच्या नवा व्हेरिएंटमुळे जगभरात चिंता वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. तसेच राज्यानेही ओमिक्रॉनचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नवी नियमावली लागू केली आहे. दरम्यान आता नाशिकच्या मराठी साहित्य संमेलनावर ओमिक्रॉनचे सावट आले आहे.

९४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन येत्या ३, ४ आणि ५ डिसेंबर रोजी नाशिकमध्ये होणार आहे. तसेच साहित्य संमेलनाच्या तयारीलाही वेग आला आहे. मात्र अशातच देशावर आता ओमिक्रॉनचे संकट ओढावले आहे. त्यामुळे याचा फटका साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमाला बसला आहे. ओमिक्रॉन विषाणूमुळे साहित्य संमेलनात निम्म्या उपस्थितींचे बंधन घालण्यात आले असून एकूण ७ हजार रसिकांना या संमेलनात परवानगी देण्यात येणार आहे.

नाशिकमध्ये पार पडणाऱ्या मराठी साहित्य संमेलनस्थळी नागरिकांना नियमांचे पालन करणे बंधनकारक असणार आहे तसेच संमेलनस्थळी रॅपिड अँटिजेन टेस्ट आणि स्क्रिनिंगची व्यवस्था करण्यात येणार आहे. कोरोनाच्या ओमिक्रॉन या नव्या व्हेरिएंटला रोखण्यासाठी यंत्रणा सर्तक झाली असून नागरिकांना मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक असणार आहे.

येत्या ३ ते ५ डिसेंबर दरम्यान होणाऱ्या या संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे आणि याठिकाणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक नामांकित अतिथी येणार आहेत. या संमेलनात सलग ३ दिवस मोठ्या सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. स्वागताध्यक्ष असलेल्या पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या देखरेखीखाली ही सर्व तयारी सुरू आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version