नूपुर शर्मा यांच्या अडचणीत वाढ

नूपुर शर्मा यांच्या अडचणीत वाढ

मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत अपशब्द टिपिणी केल्या प्रकरणी ऑल इंडिया इमाम काँसिल कडून नुपूर वर मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पक्षातून निलंबनाची कारवाई केल्यानंतर आता मुंबई पोलीस समन्स पाठवू शकतात. रझा अकादमीने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. नुपूर शर्मा यांच्या वादग्रस्त टिपण्णीवरून बराच गदारोळ झाला आहे. इस्लामिक देशांच्या संघटनेपासून ते कतार, कुवेत, इराण आणि पाकिस्तानने नाराजी व्यक्त केली आहे. भारताच्या आसपास, इस्लामिक सहकार्य संघटनेने भारताला घेरत संयुक्त राष्ट्र आणि मानवाधिकार संघटनांना भारतातील मुस्लिमांना लक्ष्य करण्याच्या विरोधात आवश्यक पावले उचलण्याचे आवाहन केले आहे.

ओआयसीच्या वतीने भारतात मुस्लिमांविरोधातील हिंसाचारात वाढ झाल्याचे सांगण्यात आले. मुंब्रा पोलिसांनी शर्मा यांना समन्स बजावत २२ जून रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. रझा अकादमीने दिलेल्या तक्रारीवरून मुंबईतील पायधुनी पोलीस ठाण्यात नुपूर शर्मा यांच्याविरोधात एफआयआर नोंदवण्यात आला आहे.

प्रेषित मोहम्मद यांच्यावरील वादग्रस्त वक्तव्य केल्याच्या आरोपावरून भारतीय जनता पक्षातून निलंबित करण्यात आलेल्या प्रवक्त्या नुपूर शर्मा आणि त्यांच्या कुटुंबीयांना दिल्ली पोलिसांनी सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. वादग्रस्त विधानानंतर आपल्याला आणि कुटुबीयांना जीवे मारण्याची धमकी देण्यात येत असल्याची तक्रार शर्मा यांनी केली होती. त्यांच्या या तक्रारीची दखल घेत दिल्ली पोलिसांनी शर्मा आणि त्यांच्या कुटुंबीयांना सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version