मास्क न घातल्यास दंडात्मक कारवाई नाही?

मास्क न घातल्यास दंडात्मक कारवाई नाही?

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांना समाजात वावरताना मास्क वापरणे बंधनकारक होते. मुंबईत मास्क न घातल्यास नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत होती. मात्र, आता मास्क सक्तीतून मुंबईकरांची लवकरच सुटका होणार आहे. मुंबई महापालिकेने मास्क मार्शलला दंडात्मक कारवाईची कडक अंमलबजावणी न करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. तर मुंबईतही कोरोनाचे चित्र नियंत्रणात आले आहे. त्यामुळे कोरोना नियमांमध्ये शिथिलता आली आहे मात्र, मास्क वापरणे बंधनकारक आहे. त्यामुळे मुंबईकरांना मास्क वापरणे अनिवार्य आहे, परंतु दंडात्मक कारवाईमध्ये शिथिलता येणार आहे.

मुंबईत विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवक मास्क मार्शलने दंडात्मक कारवाई केली आहे. आतापर्यंत विनामास्क फिरणाऱ्या मुंबईकरांकडून अंदाजे कोटींच्या घरात दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

कोरोना प्रतिबंध ३१ मार्चपासून हटणार

कोरोना नियमांबाबत केंद्र सरकारने नवी नियमावली जाहीर केली आहे. देशात लवकरच कोरोना नियममुक्ती मिळणार असून निवडक कोरोना प्रतिबंध ३१ मार्चपासून हटविण्यात येणार आहेत. मात्र, मास्क वापर आणि सामाजिक अंतराची अट पाळणे अनिवार्य असणार असल्याची घोषणा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने केली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version