‘भविष्यात कोणालाही फुकटात वीज मिळणार नाही’ – नितीन राऊत

‘भविष्यात कोणालाही फुकटात वीज मिळणार नाही’ – नितीन राऊत

भविष्यात कोणालाही फुकटात वीज मिळणार नाही, फुकटात वीज दिल्यास महावितरण बंद होईल, असा इशारा ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिला आहे. त्यामुळे वीजबिलाबाबत थकबाकी वसूल करण्याच्या भूमिकेवर राज्य सरकार असल्याचे स्पष्ट होत आहे.

औरंगाबादमध्ये आयोजित करण्यात आलेल्या महावितरणच्या बैठकीनंतर नितीन राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. विजेचा वापर करणाऱ्यांना विजेचे बिल भरावेच लागणार असल्याचे नितीन राऊत यांनी सांगितले आहे. तसेच भविष्यात कोणालाही फुकटात वीज मिळणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. वीजबिलाच्या थकबाकीमुळे महावितर बंद पडले तर त्याजागी खासगी कंपन्या कार्य करतील, असे नितीन राऊत म्हटले आहेत.

शेतकरी वीज बिल प्रश्नावरून भाजप आमदार प्रशांत बंब आणि हरिभाऊ बागडे यांनी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांची महावितरण कार्यालयात बैठक झाली. यावेळी शेतकऱ्यांकडून थकीत बिल वसुली करू नये अशी मागणी भाजप नेत्यांनी केली. मात्र वीज बिल भरावे लागेल अशी भूमिका राऊत यांनी घेतली आहे. त्यामुळे राज्य सरकार थकीत वीजबिल वसूल करण्याच्या भूमिकेवर ठाम आहे. त्यामुळे सर्वानांत थकीत वीजबिल भरावे लागणार आहे. तसेच महावितरण कर्ज काढून वीज विकत घेते तर नागरिकांना वीज फुकट का द्यायची? असा सवालही ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी उपस्थित केला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version