वेगळा निर्णय घेतला म्हणून फूट म्हणायची गरज नाही

वेगळा निर्णय घेतला म्हणून फूट म्हणायची गरज नाही

पुणे, २५ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : सुप्रिया सुळे समर्थक गटाने अजित पवार यांच्या विरोधात विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे तक्रार केल्याचे सांगितले. पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडलेली नाही. अजित पवार आजही आमचे नेते आहेत, असे वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केले. शरद पवार यांनीही सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्याचे समर्थन केले.

सुप्रिया सुळे यांचे वक्तव्य योग्यच असल्याचे शरद पवार म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडलेली नाही. अजित पवार आमचेच नेते आहेत. सुप्रिया सुळे यांनी केलेले वक्तव्य योग्य आहे, असे शरद पवार म्हणाले. वेगळा निर्णय घेणे हा त्यांचा अधिकार आहे. वेगळा निर्णय घेतला म्हणून फूट म्हणायची गरज नाही, असेही शरद पवार म्हणाले.

याआधी ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडलेली नाही. शरद पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि अजित पवार हे पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. पण अजित पवार यांनी मागील काही दिवसांत केलेल्या कृतीबाबत विधानसभेच्या अध्यक्षांकडे तक्रार केली आहे’, असे वक्तव्य राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांनी केले. पक्षात फूट पडलेली नाही मग अजित पवारांविरोधात विधानसभेच्या अध्यक्षांकडे तक्रार का केली आहे, या प्रश्नाचे उत्तर सुप्रिया सुळे यांनी दिले नाही. राष्ट्रवादीत फूट पडली नाही तर प्रतिज्ञापत्र भरून घेण्याची प्रक्रिया का राबवली जात आहे, यावर पक्षात अनेक गोष्टी दैनंदिन कामाचा भाग म्हणून सुरू आहेत असे मोघम उत्तर सुप्रिया सुळे यांनी दिले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version