म्हणून पंतप्रधान यंदा खेळणार नाहीत रंग

म्हणून पंतप्रधान यंदा खेळणार नाहीत रंग

महिला दिनाला स्वतः सोशल मीडियापासून दूर राहाण्याच्या घोषणेनंतर आता होळीला पंतप्रधान रंगांच्या खेळापासून दूर राहणार आहेत. कोरोनामुळे आपण रंग खेळणार नसल्याचं नरेंद्र मोदी यांनीजाहीर केलं आहे.

होळीच्या सणासोबत येणारा सण म्हणजे धूळवडीचा. अनेक ठिकाणी रंगपंचमी धूळवडीलाच साजरी केली जाते. दरवर्षी होळीचा सण साजरे करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यावर्षी मात्र होळीच्या खेळापासून दूर राहणार आहेत. कोरोना व्हायरसचा फैलाव होऊ नये, यासाठी होळीच्या कार्यक्रमात पण सहभागी होणार नसल्याचं पंतप्रदान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय. तसंच लोकांनीही सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होणं टाळावं, असा सल्ला नरेंद्र मोदींनी दिले आहेत.

याआधी मोदी यांनी अग्रा येथे कोरोना व्हायरसचे सहा संशयित रुग्णांची बातमी समजल्यावर लोकांनी घाबरू नये, असं आवाहन केलं होतं.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version