नितेश राणे न्यायालयात शरण जाणार; जामीन याचिका घेतली मागे

नितेश राणे न्यायालयात शरण जाणार; जामीन याचिका घेतली मागे

भाजप आमदार नितेश राणे यांनी उच्च न्यायालयातील अटकपूर्व जामीन अर्जावरील याचिका मागे घेतली आहे. तसेच नितेश राणे चौकशीला शरण येणार असल्याची माहिती समोर आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने नितेश राणे यांना १० दिवस अटकेपासून संरक्षण दिले होते. त्यामुळे या १० दिवसांमधील ५ दिवस शिल्लक असताना नितेश राणे न्यायालयात शरण येणार आहेत.

संतोष परब हल्ल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने भाजप आमदार नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला. त्यानंतर सिंधुदुर्ग सत्र न्यायालयानेसुद्धा  नितेश राणे यांना दणका दिला आहे. त्यामुळे नितेश राणे यांना जेल की बेल? यावर सर्वांचे लक्ष लागले आहे.

आमदार नितेश राणे यांचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाबाहेर पोलिसांशी हुज्जत घातल्याप्रकरणी भाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांच्यासह भाजपाच्या कार्यकर्त्यांवर मंगळवारी ओरोस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

संतोष परब हल्ल्याप्रकरणी भाजप आमदार नितेश राणे अडचणीत सापडले आहेत. याप्रकरणी नितेश राणे यांनी जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला. मात्र, सत्र न्यायालयाने हा अर्ज फेटाळला. त्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. मात्र, उच्च न्यायालयानेसुद्धा त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला. त्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालायत धाव घेतली असून याप्रकरणी आज सुनावणी पार पडली. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन फेटाळून लावला आहे. तसेच सोमवारी सिंधुदुर्ग न्यायालयानेसुद्धा नितेश राणे यांना दणका दिला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version