पंकजा आणि अजित पवारांना नीतेश राणेंचे आव्हान

हिंदुत्वाची भूमिका मांडण्यासाठी मला कोणाच्याही प्रमाणपत्राची गरज नाही, असं थेट उत्तर भाजपा उमेदवार नीतेश राणे यांनी दिलं आहे. ते विशेष मुलाखतीत बोलत होते.
पंकजा आणि अजित पवारांना नीतेश राणेंचे आव्हान

मुंबई : हिंदुत्वाची भूमिका मांडण्यासाठी मला कोणाच्याही प्रमाणपत्राची गरज नाही, असं थेट उत्तर भाजपा उमेदवार नीतेश राणे यांनी दिलं आहे. ते जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीच्या विशेष मुलाखतीत प्रसाद काथे यांच्याशी बोलत होते. नीतेश राणे यांनी हिंदुत्ववादी भूमिका घेतल्याबद्दल अजित पवार यांच्याकडून टीका होत आहे. तसेच बंटेंगे तो कटेंगे या भूमिकेचं भाजपा नेता पंकजा मुंडे यांनी समर्थन केलेलं नाही, याची आठवण करुन देत राणे यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, हिंदुत्वासाठी आम्ही राणे बंधू बोलत राहू. यामुळे कितीही शत्रू निर्माण झाले तरी चिंता नाही. आमच्या धर्माच्या रक्षणासाठी आम्ही भूमिका घेणारच. 

नीतेश राणे सध्या भारतीय जनता पार्टीचे मालवण विधानसभा मतदारसंघातील उमेदवार आहेत. कोकणावर ठाकरेंकडून अन्यायच झाल्याची टीका त्यांनी या निमित्ताने केली आहे. कोकणात कोणताही उद्योग येऊ घातला की, उद्धव आणि त्यांचे समर्थक विरोधच करतात, असं सागूंन नीतेश पुढे म्हणाले की, उद्धव यांच्या विकासविरोधी भूमिकेला कोकणी जनता पुरती ओळखते. उद्धव स्वतःच्या लेकराची काळजी घेतात तशी कोकणी जनतेने त्यांच्या पोराबाळांची काळजी वाहिली तर, चुकलं कुठं ? मात्र कोकणी माणसाच्या रोजगाराच्या संधी उद्धव यांनी हिरावूनच घेतल्या आहेत. 

या मुलाखतीत दिशा सालियान आणि सुशांत सिंह राजपूत यांच्या मृत्यूबाबतही नीतेश राणे यांनी नवा गौप्यस्फोट केला आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिशा आणि सुशांत मृत्यूप्रकरणी विशेष तपास पथकाची स्थापना केली असता त्या पथकाने अनेकांच्या जबान्या नव्याने नोंदवल्या आहेत. त्यामुळे या प्रकरणी काहीच घडत नाही असा दावा कुणीही करू नये, असं सागून नीतेश म्हणाले की, दिशा आणि सुशांत प्रकरणातील आरोपी लवकरच तुरुंगात जातील. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version