1 सप्टेंबरपासून वाहतूक नियमांचा भंग केल्यास भरघोस दंड वाढवण्यात आला आहे. वाढते रस्ते अपघात रोखण्याचा उपाय म्हणून दंडाच्या रकमेत ही वाढ केल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच अल्पवयीन मुला-मुलीने वाहन चालवून गुन्हा केल्यास मालक वा पालकाला भोगावा लागणार आहे. असाही बदल करण्यात आला आहे. मोटार वाहतूक दुरस्ती विधेयकानुसार दंडाच्या रकमेत वाढ करण्यात आली आहे.
मोटार वाहनदुरस्ती विधेयक 2019 हे 1 ऑगस्टला संसदेत मंजूर झाले आहे. वाहतुकीचे नियम मोडल्यास दंडाच्या रकमेत किमान चारपट आणि कमाल दहापट वाढ करण्यात आली आहे. वाढणारे अपघात लक्षात घेवून हे नियम लागू करण्यात आले आहेत.
रस्ते नियमांचा भंग केल्यास जुना दंड 100 रुपये होता. आता नवीन दंड 500 रु आकारण्यात येणार आहे. प्रशासनाचा आदेशभंग केल्यास जुना दंड 500 रु, होता तो आता २,००० रु. करण्यात आला आहे. परवाना नसलेले वाहन चालवल्यास 500 रुपयांचा दंड 5.000 रु इतका वाढवण्यात आला आहे.
पात्र नसताना वाहन चालवला तर 10.000 रु करण्यात आला आहे. तो याआधी 500 रुपये इतका होता. वाहन चालवताना वेग वाढवला तर २,००० रु इतका दंड आकारण्यात येणार आहे. धोकादायक असलेले वाहन चालवले तर 5.000 रु दंड भरावा लागणार आहे.
मद्यपान करुन वाहन चालवल्यास 10.000 रु दंड आकारण्यात येणार आहे. अॅम्ब्युलन्ससारख्या महत्त्वाच्या वाहनांनाही रस्ता दिल्यास आता दंड आकारण्यात आला आहे. मुला-मुलीने वाहन चालवून गुन्हा केल्यास मालक वा पालकाला भोगावा 25.000 रु. दंड व मालक – पालक दोषी ठरवले जाणार आणि त्यांना वर्षे तुरुंगवास भोगावा लागणार आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.