‘ओमिक्रॉन’ विषाणूमुळे राज्यात नवी नियमावली लागू

‘ओमिक्रॉन’ विषाणूमुळे राज्यात नवी नियमावली लागू

देशातील कोरोना परिस्थितीत काही प्रमाणात शिथिलता येत आहे. मात्र अशातच दक्षिण आफ्रिकेत कोरोना विषाणूचा नवा व्हेरिएंटमुळे जगभरात चिंता वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उच्चस्तरीय बैठक घेत सर्व राज्यांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. तसेच परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची खबरदारी घेण्यात यावी असेही केंद्राने राज्यसरकारला सुचवले आहे.

ओमिक्रॉन विषाणूमुळे राज्यात नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. सार्वजनिक वाहतुकीसाठी नागरीकांचे पूर्ण लसीकरण असणे आवश्यक आहे. तसेच लसीच्या दोन डोसनंतर १४ दिवस पूर्ण होणे अनिवार्य आहे. सार्वजनिक वाहतूक प्रवासासाठी युनिव्हर्सल पास ग्राह्य धरला जाणार आहे.

दुकाने आणि मॉल्समध्ये जाण्यासाठी नागरिकांनी लसीचे दोन्ही मात्रा घेणे बंधनकारक आहे. दोन डोस घेतलेल्यांनाच रिक्षा, टॅक्सी, बस आणि कॅबमध्ये प्रवास करता येईल. लस घेतली नाही तर प्रवाशांना प्रवास करता येणार नाही. परदेशांतून येणाऱ्या प्रवाशांना ७२ तासांच्या आत आरटीपीसीआर रिपोर्ट निगेटिव्ह असणे आवश्यक आहे. सार्वजनिक कार्यक्रमांसाठी संख्येनुसार नियमावली तसेच सार्वजनिक ठिकाणी कोरोना प्रतिबंधक वागणूक अनिवार्य आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version