देशभरात नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ आणि केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विविध ठिकाणी आंदोलने सुरू आहेत. या आंदोलनाला अनेक राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांचा पाठिंबा मिळत असताना, तमिळनाडूचे मुख्यमंत्री तसेच तमिळगा वेत्री कळगम (TVK) पक्षाचे अध्यक्ष सी. जोसेफ विजय यांनीही या विषयावर आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे.
बुधवारी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात थलपती विजय यांनी नवी दिल्लीत नीट प्रकरणावर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिस कारवाईचा निषेध नोंदवला. तसेच काँग्रेस नेते राहुल गांधी आणि इतर विरोधी पक्षांच्या नेत्यांना ताब्यात घेतल्याबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली. विद्यार्थी आंदोलकांवर करण्यात आलेली कारवाई ही लोकशाहीच्या मूल्यांविरोधात असल्याचे सांगत त्यांनी तिला “अलोकतांत्रिक” असे संबोधले.
संसद परिसरात झालेल्या ‘संसद मार्च’ आंदोलनानंतर टीव्हीके पक्षाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर (पूर्वीचे ट्विटर) अधिकृत भूमिका जाहीर केली. या निवेदनात संसद परिसरात आंदोलन करणाऱ्या विरोधी पक्षांसोबत टीव्हीके ठामपणे उभा असल्याचे नमूद करण्यात आले. त्याचबरोबर, नीट परीक्षेला पक्षाचा सुरुवातीपासूनच विरोध असल्याची भूमिका पुन्हा अधोरेखित करण्यात आली.
தலைநகரில் ஜனநாயகம் நசுக்கப்படுவது வன்மையாகக் கண்டிக்கத்தக்கது! டெல்லியில் நடைபெற்ற இளைஞர்களின் அறவழிப் போராட்டத்துக்கு ஆதரவாகக் களமிறங்கிய மக்களவை எதிர்க்கட்சித் தலைவர் திரு. ராகுல் காந்தி அவர்கள் டெல்லி காவல்துறையால் இழுத்துச்செல்லப்பட்டும் குண்டுக்கட்டாகத் தூக்கிச் சென்றும்… — TVK Party HQ (@TVKPartyHQ) July 21, 2026
टीव्हीकेने आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, नीट परीक्षा सुरू झाल्यापासून तिच्या विश्वासार्हतेवर सातत्याने प्रश्न उपस्थित होत आहेत. या परीक्षेमुळे विद्यार्थ्यांवर मानसिक ताण वाढत असून त्यांच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक भवितव्यावरही परिणाम होत आहे. पक्षाच्या मते, नीट परीक्षेमुळे दरवर्षी हजारो विद्यार्थ्यांचे नुकसान होत असून ही परिस्थिती थांबवण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने नीट परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घ्यावा. त्यामुळे, नीट परीक्षा पूर्णपणे रद्द करण्याची मागणी टीव्हीकेने पुन्हा एकदा केंद्र सरकारकडे केली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.