“आज तेच ठाकरे तुमच्यावर थुंकले”, निलेश राणेंनी डिवचलं

“आज तेच ठाकरे तुमच्यावर थुंकले”,  निलेश राणेंनी डिवचलं

महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये शिवसेनेच्या (Shivsena) अनेक नेत्यांना डावललं गेल्यामुळे नाराजी आहे.  शिवसेनेचे विधान परिषदेतील ज्येष्ठ नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांना ही मंत्रीमंडळ विस्तारात स्थान मिळालं नसल्यामुळे ते नाराज आहेत. अशातच त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम माजी मुख्यमंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांचे पुत्र निलेश राणे (Neelesh Rane) यांनी आपल्या Tweet मधून केलंय.

“रामदास कदम तुम्ही संपूर्ण वेळ राणेंना शिव्या घालून ठाकरेंना खुश करण्यासाठी घालवला आणि तेच ठाकरे तुमच्यावर थुंकले” अशा शब्दांत निलेश राणे यांनी रामदास कदम यांना डिवचलं आहे. ‘तुम्ही आम्हाला शिव्या घालून तुम्ही शिवसेनेशी (Shivsena) किती निष्ठावान आहात हे दाखवायचा पण आज तुम्हाला उलट शिवी घालणार नाही कारण न घालता ती तुम्हाला बसलेली आहे,’ असंही निलेश यांनी tweet मध्ये केलं आहे.

अनेकजण नाराज

मंत्रिमंडळ विस्तारानंतर शिवसेनेत नाराज आमदारांची वाढती संख्या पहायला मिळतेय. यामध्ये ज्येष्ठ आणि माजी मंत्र्यांचा समावेश आहे. यामध्ये सुनिल प्रभू, सुनिल राऊत, रविंद्र वायकर, रामदास कदम, दिवाकर रावते, भास्कर जाधव, प्रकाश आबिटकर, अनिल बाबर, तानाजी सावंत, संजय रायमुलकर, प्रताप सरनाईक, संजय शिरसाट या आमदारांचा समावेश आहे. या नाराज आमदारांची आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कशी समजूत काढतात हा खरा प्रश्न आहे

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version